बावधानमधील कचरा वेळेवर उचलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:10 IST2021-03-28T04:10:01+5:302021-03-28T04:10:01+5:30
बावधान मधील प्रभाग क्र. १० मधील बावधन परिसरातील वेळेवर कचरा घेऊन न जाणे, रस्त्यांच्या दुतर्फा झाडून न घेणे याबाबत ...

बावधानमधील कचरा वेळेवर उचलावा
बावधान मधील प्रभाग क्र. १० मधील बावधन परिसरातील वेळेवर कचरा घेऊन न जाणे, रस्त्यांच्या दुतर्फा झाडून न घेणे याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून कचऱ्याबाबत बिकट समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याची माहिती नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी दिली आहे.
परिसरातील वाढत्या तक्रारींचे योग्य वेळी निवारण व्हावे, याकरिता पुणे महापालिका मलनि:सारण विभागाचे उपआयुक्त अजित देशमुख यांच्या समवेत बावधन येथील बायोगॅस प्रकल्प व प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांसह नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच बावधन येथील आरोग्य कोठीवर 25 कर्मचारी नेमण्यात यावे याबाबतचे निवेदन यावेळी देण्यात आले.
एक ते दोन आठवड्यांमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन पुणे महानगरपालिका मल नि:सारण विभागाचे उपआयुक्त अजित देशमुख यांनी यावेळी दिले. याप्रसंगी अतुल पाटील, दीपा प्रभू, मनीष देव, अजित साने, राखी सराफ व आदी नागरिक उपस्थित होते.