शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 20:10 IST

कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत...

पुणे : पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांचा भाजपमध्ये प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. शरद मोहोळ हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल आहेत.

पुणे पोलिसांनी शरद मोहोळविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईसुद्धा केली होती. शरद मोहोळ (pune gangster sharad mohol येरवडा कारागृहात असताना त्यांनी दहशतवादी कातील सिद्दिकी याचा खून केला होता. अशा कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

यापूर्वी टाळला होता प्रवेश-

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमातही स्वाती मोहोळ यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकच पुण्यात प्रकाशन झाले होते. त्यावेळी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार केला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते. पण त्यावेळी स्वाती मोहोळ यांना पक्षात प्रवेश देण्यात आला नव्हता.

एरवी प्रत्येक कार्यक्रमानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी मात्र या पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

कोण आहे शरद मोहोळ? गुंड शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिक सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीला अंडासेलमध्ये  गळा आवळून फास दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र पुराव्याअभावी शरद मोहोळ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्याच्या विरोधात पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPuneपुणेBJPभाजपा