शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police: गुंड निलेश घायवळला पोलिसांचा पुन्हा दणका; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 11:08 IST

पुणे-नगर रस्त्यावरून निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराचा ताफा जात होता...

- किरण शिंदे

पुणेकुख्यात गुंड निलेश घायवळ याला पुणे पोलिसांनी पुन्हा दणका दिला आहे. पुणे-नगर रस्त्यावरून निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराचा ताफा जात असताना खराडी परिसरात वाहतूक पोलिसांनी त्याचा ताफा अडवला. सुरुवातीला त्याने पोलिसांशी हुजत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि दंड वसूल केला. गाडीवर काळ्या काचा लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा हजार रुपयाचा दंड बसून केला.

नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. घायवळच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत होती. त्याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी, दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण, असे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. नीलेश घायवळ आणि गजानन मारणे याच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतरी गुंडांची हत्या झाली. नीलेश घायवळ एकेकाळी गजानन मारणेचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जायचा. मारणे टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात वाढली. मारणे आणि घायवळने अनेक तरुणांना टोळीत सामील करून घेतले होते. वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. अखेर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. नंतर मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळने स्वत:ची टोळी सुरू केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड