तरुणाच्या खुनाचा प्रयत्न प्रकरणात गँगस्टर बंडू आंदेकरसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:43+5:302021-03-04T04:18:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याने तसेच पूर्ववैमनस्याने तरुणावर कोयता, पालघनसारख्या हत्याराने वार ...

Gangster Bandu Andekar arrested in attempted murder case | तरुणाच्या खुनाचा प्रयत्न प्रकरणात गँगस्टर बंडू आंदेकरसह दोघांना अटक

तरुणाच्या खुनाचा प्रयत्न प्रकरणात गँगस्टर बंडू आंदेकरसह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत ठरल्याने तसेच पूर्ववैमनस्याने तरुणावर कोयता, पालघनसारख्या हत्याराने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी बंडू आंदेकर व त्याच्या टोळीतील ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६०), ऋषभ देवदत्त आंदेकर या दोघांना अटक केली आहे. बंडू आंदेकर याच्या इशाऱ्यावरून हा जीवघेणा हल्ला केला होता. खडक पोलिसांनी काल रात्री आंदेकर याला नाना पेठेतील राहत्या घरातून अटक केली.

याप्रकरणी ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बाबू आळी) याने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

शहराच्या मध्य वस्तीतील नाना पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ परिसरात आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे. आंदेकर कुटुंबातील दोघे जण सध्या नगरसेवकही आहेत. ओंकार कुडले आणि आंदेकर टोळी यांच्या यापूर्वी अनेकदा वादावादी झाली आहे. ओंकार कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचे बंडु आंदेकर याला वाटू लागले होते. त्यातूनच त्याच्या सांगण्यावरुन व पूर्ववैमनस्यातून ऋषभ आंदेकर, गाडी गण्या, सुरज व इतर अशा ५ जणांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार याच्यावर कोयता, पालघन अशा धारधार हत्याराने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कुडले याच्या फिर्यादीनंतर मंगळवारी रात्री उशिरा बंडुअण्णा आंदेकर व ऋषभ आंदेकर या दोघांना अटक केली आहे.

आंदेकर-माळवदकर या दोन टोळ्यांमधील टोळी युद्धात दोन्ही टोळ्यांमधील अनेकांचे खुन पडले. माळवदकर टोळी नेस्तनाबूत झाली. मात्र, आंदेकर टोळीने आपले वर्चस्व गेल्या साडेतीन दशकापासून पूर्व भागात कायम ठेवले आहे. या टोळीयुद्धात बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती. १९८५ पासून बंडू आंदेकरवर याच्या खून, खुनाचा प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे अपहरण अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हा फरासखाना, खडक व समर्थ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Web Title: Gangster Bandu Andekar arrested in attempted murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.