कुत्रा चावल्याने जाब विचारल्यामुळे टोळक्याचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST2021-05-10T04:10:00+5:302021-05-10T04:10:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुत्रा चावल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून टोळक्याने महिलेला शिवीगाळ करून परिसरात दहशत माजवत ...

कुत्रा चावल्याने जाब विचारल्यामुळे टोळक्याचा राडा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कुत्रा चावल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून टोळक्याने महिलेला शिवीगाळ करून परिसरात दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी कार्तिकी भुजबळ, प्रशांत देवडे, राहुल कांबळे व त्याच्या ३ ते ४ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अनिता अर्जुन नाईक (वय ३५, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.
अनिता यांच्या मावस बहिणीचा मुलगा दुर्गेश गायकवाड याला कार्तिकी भुजबळ यांच्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्याचा जाब विचारल्यामुळे कार्तिकी आणि अनिता यांच्यात वाद झाला होता. त्याच रागातून ७ मे रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास टोळक्याने अनिता यांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्याशिवाय परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. ढावरे अधिक तपास करीत आहेत.