जेजुरीत ट्रक चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:23+5:302021-03-17T04:13:23+5:30
जेजुरी : डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन ट्रक चोरीला गेले होते. या ...

जेजुरीत ट्रक चोरणारी टोळी गजाआड
जेजुरी : डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन ट्रक चोरीला गेले होते. या घटनेतील आरोपींना गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असूण आराेपी हे कर्नाटकातील आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून डिसेंबर महिन्यात १५ लाख ८१ हजार रुपये किमतीच्या एशियन कलरचे डबे भरलेला ट्रक चोरीस गेला होता. तर जानेवारी महिन्यात २१ लाख रुपये किमंत असणारा १६ चाकी ट्रक तर फेब्रुवारी महिन्यात जेजुरी आयएसएमटी कंपनीतून लोखंडी बार भरलेला ट्रक चोरीला गेला होता. या गुन्ह्याच्या तपासात सुरवातील काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत सातारा, कोल्हापूर, सांगली, गणेशवाडी, नृसिंहवाडी, कर्नाटकातील मंगसुळी, उगार या भागात ट्रकचा शोध घेण्यात आला. या तपासा बाबत ट्रक चोरी करणारा विशाल घस्ते यास पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केले असता एका साथीदाराच्या मदतीने ट्रक चोरीची कबुली दिली. तसेच हे ट्रक कागवाड जवळील उगार येथील दत्ता कदम यास दिले असल्याचे आरोपीने सांगितले.
आरोपी विशाल घस्ते व त्याचा साथीदार रियाज मुल्ला रा. कोल्हापूर यांना अटक केली असून त्यांनी जेजुरी आय एस एम टी कंपनीतून लोखंडी बार सहित ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर चोरीचे ट्रक घेणारा दत्ता कदम फरार झाला असल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली आहे.