शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर स्थानकात चोरांची टोळी, गर्दीचा घेताहेत गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:06 IST

गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी व महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपयांचे पाकीट लांबविल्याची घटना राजगुरुनगर एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. २४) घडली.

राजगुरुनगर : गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी व महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपयांचे पाकीट लांबविल्याची घटना राजगुरुनगर एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. २४) घडली. खेड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हौसीराम दगडू कुटे (वय ६१, सध्या रा. घाटकोपर, मुंबई; मूळ रा. कोहिंडे बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. कुटे सकाळी साडेअकरा वाजता परळ ते जांबूत गाडीने राजगुरुनगर एसटी स्थानकावर उतरले. त्यांना कडूस येथे सोसायटीमध्ये शेतीबाबतच्या कामासाठी जायचे होते. पावणेबाराच्या सुमारास कडूस गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातीलदीड तोळे वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविली.

दुसऱ्या घटनेत रंजना माणिक रोकडे (रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रोकडे यांना डिंभे याठिकाणी जायचे होते म्हणून त्या राजगुरुनगर बसस्थानकात थांबल्या होत्या. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-भीमाशंकर गाडी आली. गाडीला गर्दी होती. त्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र वाहकाने गर्दी असल्याने गाडीत येऊ नका असे दारातील लोकांना सांगितले, म्हणून त्या पुन्हा खाली उतरल्या.त्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून आतमध्ये ठेवलेले पैशाचे पाकीट लांबविले. त्यामध्ये तब्बल ६० हजार रुपये होते. खेड पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला असून, पोलीस नाईक तानाजी हगवणे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा