कोथरूड भागात टोळक्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:09 IST2021-06-20T04:09:19+5:302021-06-20T04:09:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्येतून एका युवकाला मारण्यासाठी आलेल्या टोळक्याने त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केली. हा प्रकार कोथरूड ...

Gang terror in Kothrud area | कोथरूड भागात टोळक्याची दहशत

कोथरूड भागात टोळक्याची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्येतून एका युवकाला मारण्यासाठी आलेल्या टोळक्याने त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केली. हा प्रकार कोथरूड भागातील शीलाविहार कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला.

या घटनेत रामचंद्र पायाळ आणि त्यांची पत्नी जखमी झाली. पायाळ (वय ४५, रा. कोथरूड) यांनी यासंदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पायाळ यांचा मुलगा करण याची एका आरोपीबरोबर भांडणे झाली होती. टोळके पायाळ यांच्या घरात शिरले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. करण येथे राहतो का? अशी विचारणा टोळक्याने केली. पायाळ यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर पायाळ यांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी आली. तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. टोळक्याने त्यांच्या घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून दिल्या. पोलिसांकडे तक्रार दिली तर कुटुंबीयांना मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यावेळी या परिसरातील रहिवासी पायाळ यांच्या घराबाहेर जमले होते. टोळक्याने रहिवाशांना धमकावून शिवीगाळ केली. दुचाकीवरून आरोपी पसार झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.

---

Web Title: Gang terror in Kothrud area