पुण्यात दांडेकर पुलावर टोळक्यांनी १५ गाड्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:11 AM2019-07-24T10:11:11+5:302019-07-24T10:11:19+5:30

दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला.

The gang smashed 3 cars on the Dandekar bridge in Pune | पुण्यात दांडेकर पुलावर टोळक्यांनी १५ गाड्या फोडल्या

पुण्यात दांडेकर पुलावर टोळक्यांनी १५ गाड्या फोडल्या

Next

पुणे : दांडेकर पुलाजवळील आंबिल ओढा परिसरात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या १५ गाड्यांवर दगडफेक करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री ११ वाजता घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंबिल ओढा येथील सर्व्हेनंबर १३२ येथील झोपडपट्टीत ही घटना घडली. या प्रकरणी टेम्पोचालक नेताजी डांगे यांनी फिर्याद दिली आहे.

शहरात रात्री-अपरात्री किरकोळ कारणावरून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३२ येथील झोपडपट्टीमध्ये बाहेर दुचाकी वाहने लावण्यात आल्या होत्या. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ४ जणांचे टोळके आता काठ्या घेऊन आले होते. त्यांनी आल्या आल्या रस्त्याकडेच्या दुचाकी गाड्या फोडण्यास सुरुवात केली.

त्याचा आवाज ऐकून नेताजी डांगे हे बाहेर आले. त्यांनी मुले गाड्यांची तोडफोड करीत असल्याचे पाहून आरडाओरडा केला. तेव्हा लोक घरातून बाहेर आले. हे पाहून हे चौघेही जण पळून गेले. त्यांच्या या तोडफोडीत १३ दुचाकी, १ मोटार आणि १ रिक्षाचे नुकसान झाले आहे.

Web Title: The gang smashed 3 cars on the Dandekar bridge in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.