दरोडेखोरांची टोळी जेरबंद
By Admin | Updated: August 14, 2014 04:33 IST2014-08-14T04:33:51+5:302014-08-14T04:33:51+5:30
जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये घातक हत्यारांसह दरोडे टाकणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे

दरोडेखोरांची टोळी जेरबंद
पुणे : जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये घातक हत्यारांसह दरोडे टाकणाऱ्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील चारजणांना अटक केली असून पोलिसांनी २ तोळे सोन्यासह ४ मोबाईल हस्तगत केले आहेत.
भाऊ उर्फ भावड्या बेळ्या काळे (वय २३), राजू ऊर्फ लंगड्या सुल्या पवार (वय २०), अनिल सुल्या पवार (वय २३), अविनाश उर्फ लल्ल्या उर्फ आकाश बेळ्या पवार (वय २०, सर्व रा. जवळा, ता. जामखेड, जि. नगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार वंट्या उर्फ संतोष दिलीप काळे, सचिन दिलीप काळे (रा. जामखेड, जि. नगर) हे पसार होण्यात यशस्वी झाले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालीत असताना सोलापूर- पुणे महामार्गावर थेऊन फाटा येथे एका मंदिराच्या भिंतीजवळ ७ ते ८ जण संशयास्पद अवस्थेत आढळून आले.
पोलिसांना संशय आल्याने
त्यांच्या दिशेने जात असताना आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन नागरिकांच्या मदतीने चारजणांना पकडले. फरारी आरोपी बाबुशा टकाऱ्या काळे (वय ३२) यालाही अटक केली. (प्रतिनिधी)