खोटे दस्तऐवज बनवून लाखोचा गंडा घालणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:46+5:302021-01-08T04:33:46+5:30
लोणीकंद: खोटे दस्तऐवज बनवुन नागरिकांची करोडोंची फसवणुक करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत गजाआड़ केले असल्याची ...

खोटे दस्तऐवज बनवून लाखोचा गंडा घालणारी टोळी गजाआड
लोणीकंद: खोटे दस्तऐवज बनवुन नागरिकांची करोडोंची फसवणुक करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावत गजाआड़ केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे. भैरवनाथ बाबुराव साळुंखे (रा.धायरकर कॉलनी,कोरेगाव पार्क पुणे),योगेंद्र रघुनाथ खिस्ते (अल्फा प्रीमियर,विमाननगर पुणे),संदीप सेवकराम बसतानी (वय ३८ रा.फ्लॅट नं ५०२, लक्ष्मी इंक्लेव लोणकर वस्ती मुंढवा), सुदेश संभाजी राव (वय ३४.रा.सुदर्शननगर पिपळे गुरव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अपूर्व सुभाषचंद्र नागपाल (रा.क्लेवर हिल्स,कोंढवा पुणे) यांनी दिली. आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अपूर्व नागपाल यांचे आव्हाळवाडी येथील गट नं १२३५ मध्ये एकूण ४ एकर क्षेत्र असून त्यामध्ये फार्महाऊस आहे. त्याचा सात बारा हा त्यांचे भावाच्या नावावर असून दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी काही लोक या जागेवर जेसीबी घेऊन साफसफाई करत असल्याची माहिती अपूर्व नागपाल यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तेथे धाव घेत चौकशी केली असता, तेथे असणाऱ्या तांबे नामक व्यक्तीने ही जमिन अपूर्ण नागपाल व इतरांडून विकत घेतल्याचे सांगितले. एवढेच नाही तर बँकेच्या चेकने ईसार पावती म्हणून १ कोटी दिले आहेत व ६.५ कोटी खरेदीखतच्या दिवशी देणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
ही माहिती मिळताच अपूर्व नागपाल यांना धक्काच बसला. त्यांनी असा कोणताही व्यवहार केला नसतानाही त्यांची जमिनी विकली गेल्याचे समोर आहे. त्यांनी लगेचच संबंधित व्यक्तीला आपण नागपाल असल्याचे सांगत आपण कधीही यापूर्वी भेटलो नसल्याचे सांगितले. त्यांनतर अपूर्व नागपाल यांच्यासह त्या व्यक्तीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर या गुन्ह्यात आठ ते १० लाेकांची १ कोटीची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सुरु केला. तपासात खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील सशंयीत वाघोली येथे येणार होते. पोलिसांनी
त्या ठिकाणी छापा टाकून चौघांना गजाआड केले.
०४ लोणीकंद टोळी
खोटे दस्त बनवून फसवणूक करणाऱ्या संशयितांसमवेत पोलीस.