शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गेम वाजवण्यासाठी गेले आणि गजाआड झाले ; उपद्रवी टोळक्याला अखेर अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 21:26 IST

सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर व समर्थ नगर परिसरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने हातात नंग्या तलवारी व कोयते घेऊन वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती .

ठळक मुद्देवाहनांची तोडफोड करणारे गजाआड,पाच तासात केले अटकसिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी; बंटी पवार याचा गेम वाजवण्यासाठी आले होते टोळके

पुणे  : सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर व समर्थ नगर परिसरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने हातात नंग्या तलवारी व कोयते घेऊन वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती .या तोडफोड करणाऱ्या व दहशत पसविणाऱ्या तेरा जणांना हडपसरमधून अवघ्या पाच तासात सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक करून त्यांना आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुंदर रामचंद्र शर्मा (वय १९) विक्रम प्रमोद पवार (वय १९) लक्ष्मीकांत रमेश देसाई (वय १९) साहिल उर्फ परवेज हैदरअली  इनामदार ( वय १८)  सुमित राजकुमार सुरवसे (वय  २०)  प्रसाद सोपान बांदल (वय २३) अनिकेत राजु वायदंडे (वय १९)  प्रफुल्ल भारत कांबळे (वय १९) अक्षय युवराज ठाकरे (वय २४ )   ऋतिक सुदाम इंगोले (वय १९ )  सनी उर्फ गिरीष महेंद्र हिवाळे (वय २०) सर्व रा .काळे पडळ, हडपसर,पुणे ह्या अकरा आरोपीना अटक केली असून दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.  सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एका टोळक्याने टेम्पो,कार, ट्रक,रिक्षा, मोटारसायकल आदी वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करीत येथील सुधाकर विठ्ठल भजनावळे यांच्या घरात घुसून टीव्ही, फ्रिज, पंखे, इत्यादी साहित्यांची मोडतोड केली. तसेच, तुकाईनगर येथील रब्बानी सय्यद यांच्या किराणा दुकानात घुसून काउंटर व आतील समानांची मोडतोड केली. तुकाईनगरमधील गल्लीमधील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या बऱ्याच मोटारसायकलीचेही नुकसान केले आहे. परिसरात या टोळक्याने रस्त्यावर उभी असलेली रिक्षा,टेम्पो,दुचाकी, स्कार्पिओ, कार, मारुती व्हॅन,ट्रक ,टेम्पो,आदी वीस ते पंचवीस वाहनांच्या काचा फोडुन कोयत्याने व तलवारीने मोडतोड करून परिसरात दहशत माजवुन मोठे नुकसान केले. या टोळक्यांच्या हल्ल्यात समीर अलिफ शेख (१८वर्षे ),सुधाकर विठ्ठल भजनावळे (४८ वर्षे )व बाळकृष्ण तुकाराम राऊत (३४ वर्षे ) जखमी झाले आहेत.बंटी पवारचा गेम वाजवण्यासाठी हडपसरमधून आले होते टोळके मोक्का अंतर्गत कारवाई केलेला सराईत गुन्हेगार बंटी पवार सुटल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी बंटी पवार याच्या साथीदारांनी त्याच्या सांगण्यावरून चेतन ढेबे याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार चेतन पांडुरंग ढेबे व राहुल महादेव वायबसे (रा. तुकाई नगर, वडगाव बुद्रुक ,पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र झालेला हल्ल्याचा राग मनात धरून चेतन ढेबे याने  हडपसरमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांशी संपर्क करून बंटी पवारचा गेम वाजवण्यासाठी त्यानेच हडपसर येथुन हे टोळके आणले होते. मात्र नेमका याच वेळी बंटी पवार हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर असल्यामुळे या गेम मधुन तो वाचला. परंतु टोळक्यांना बंटी पवार न सापडल्यामुळे याचा राग येऊन तो राहत असलेल्या परिसरातील वाहनांची तोडफोड या टोळक्याने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस