शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 22:25 IST

त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र रात्र जागवत पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यावर्षी मात्र...

पुणे-  पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कित्येक वर्ष चर्चा असते ती खास आकर्षण असलेल्या या गणपतींची.. त्यामुळे त्यांचा थाटही तसाच भाविकांचे नयन धन्य करणारा असतो. त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र जागवून पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यामध्ये श्रीमंत  दगडूशेठ गणपती , भाऊ रंगारी, अखिल मंडई शारदा गजानन, जिलब्या मारुती, बाबू गेनू मंडळाचा नवसाचा गणपती अशी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारे हे गणपती यावर्षी वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झाले आहे.   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी पोलिसांनी काही मंडळांना थांबवत या सर्व गणपतींना विसर्जन मिरवणुकीत जागा करुन दिली आहे. तसेच गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत या सर्व गणेश मंडळांना वेळेत सहभाागी करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे या मंडळांनी पोलिसांना सहकार्य करत वेळेआधीच लक्ष्मी रस्त्यावरव मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला. यामुळे रात्री उशिरा या गणपतींना पाहण्याची सवय झालेल्या सर्व भक्तांना आश्चर्याचा धक्का बसला.  सत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिलब्या मारुती सायंकाळी ७ वाजता बेलबाग चौकात हजर झाला. जवळपास तीन तास लवकर त्याचे आगमन तेथे झाले. बाबू गेनू ८ वाजता आणि भाऊ रंगारी सव्वा आठ वाजता बेलबाग चोकात आरुढ झाले. अखिल मंडईचा गणपती हा साधारण साडे नऊ वाजता मिरवणुक रस्त्यावर आला. श्रीमंत दगडूशेठ ज्याचे दर्शनासाठी भाविकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असते तो अंदाजे साडे दहाच्या सुमारास बेलबाग चोकात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर