भोर शहरात गाजावाजा न करता शांततेत गणेश विर्सजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST2021-09-16T04:13:48+5:302021-09-16T04:13:48+5:30
पाचव्या दिवशीच्या गणपती विसर्जनासाठी भोर नगरपालिकेच्या वतीने शहरातील चौपाटी, भोर नगरपालिका चौक, नगरपालिका शाळा नं. ३ येथे गणपती विसर्जन ...

भोर शहरात गाजावाजा न करता शांततेत गणेश विर्सजन
पाचव्या दिवशीच्या गणपती विसर्जनासाठी भोर नगरपालिकेच्या वतीने शहरातील चौपाटी, भोर नगरपालिका चौक, नगरपालिका शाळा नं. ३ येथे गणपती विसर्जन आणी निर्माल्या घेण्याची सोय करण्यात आली होती. तर राजवाडा चौकात निर्माल्या घेण्यासाठी गाड्या ठेवण्यात आल्या होत्या आणि गणपती विसर्जन नीरा नदीघाटावर करण्यात आले होते. त्यासाठी नदीपात्रात जीवरक्षकाची व रात्रीसाठी विजेची सुविधाही केली होती. तिथे घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन करण्यात आले. भोरच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी नगरपालिका चौकात नगरपालिकेने तयार केलेल्या गणपती विसर्जन हौदात गणपती विसर्जन केले. अनेक नागरिकांनी घरगुती गणपतीचे विसर्जन केले.
ग्रामीण भागातील सार्वजनिक मंडळे आणी घरगुती गणपतीचे कोरोनामुळे कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता शांततेत विसर्जन करण्यात आले. भोर पोलिसांनी विसर्जनासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी कोणताही गाजावाजा न करता कोरोना नियमांचे पालन करून गणेश विसर्जन केले आणी प्रशासनाला सहकार्य केले.