Ganesh Visarjan 2021: गज गवाक्ष कुंडात झाले मंडईच्या गणरायाचे विसर्जन; गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 20:39 IST2021-09-19T20:39:24+5:302021-09-19T20:39:38+5:30
उत्साहपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे १२८ वे वर्ष

Ganesh Visarjan 2021: गज गवाक्ष कुंडात झाले मंडईच्या गणरायाचे विसर्जन; गणरायाला भावपूर्ण निरोप
पुणे : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष....मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर...फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव करीत भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या गज गवाक्ष अमृत कुंडात गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं चे विसर्जन करण्यात आले. अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जन झाले.
यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात,उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर आदी उपस्थित होते.
अण्णा थोरात म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने मंदिरातच उत्सव साजरा करण्यात आला आणि मंदिर परिसरातच विसर्जन करण्यात आले. पुणेकरांनी देखील मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी न करता उत्सव यशस्वी करण्यास सहकार्य केले, याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.