शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

धार्मिक भेदाला छेदणारी ‘सिध्द’ स्वरानुभूती! मजहरच्या‘सिध्दीविनायक’गाण्याला यु ट्यूबवर भरभरून पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 23:00 IST

मला लहानपणापासून घरातून सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळाले....

ठळक मुद्देमजहर सिद्दीकीचा संगीत प्रयोग : गणपतीच्या ५३ नावांचा गाण्यात समावेशईद, बकरी ईद, दिवाळी, होळी असे सर्व सण आम्ही सर्वजण एकत्र मिळून साजरे करतो

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : संगीत...जे मनाला भावतं आणि ह्रदयाचा ताबा घेतं! भाषिक, प्रादेशिक सीमा ओलांडून सुरांची जादू सर्वांना आपलीशी करते. संगीतातून मिळणारी स्वरानुभूती कोणताच भेदाभेद मानत नाही. मजहर सिद्दीकी या २४ वर्षीय तरुणाने सुरांचा आनंददायी ठेवा रसिकांसाठी आणला आहे. गणपतीची ५३ नावे समाविष्ट करुन त्याने ‘सिध्दीविनायक’ हे गाणे सरहद म्युझिकच्या सहाय्याने संगीतबध्द केले आहे. यूट्यूबर या गाण्याला रसिकांची भरभरुन पसंती मिळत आहे.‘मी मजहर सिद्दीकी...भारतीय मुस्लिम असल्याचा मला अभिमान आहे. मला लहानपणापासून घरातून सर्वधर्मसमभावाचे संस्कार मिळाले. कुराण शरीफबरोबरच भगवतगीतेचे शिक्षणही मिळाले. मी ६ वर्षांचा असताना वडील मला शहरातील अनेक मंदिरांमध्ये घेऊन जायचे. त्यामुळे कीर्तन, प्रवचन ऐकण्याची आवड तेव्हापासूनच माझ्यात रुजली. मी स्वत:ही मंदिरांमध्ये भजन गायचो. ईद, बकरी ईद, दिवाळी, होळी असे सर्व सण आम्ही सर्वजण एकत्र मिळून साजरे करायचो. सरहद म्युझिकच्या माध्यमातून मी ‘सिध्दीविनायक’ हे गणपती नामावलीचे गीत संगीतबध्द करुन गाण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये गणेशाच्या १०८ नावांपैकी ५३ नावांचा समावेश करण्यात आला आहे’, अशी माहिती मजहरने ‘लोकमत’शी बोलताना दिली.मजहर काश्मीरी संगीतामध्ये विविध प्रयोग करु पाहत आहे. काश्मीरी लोकगीते पुनरुज्जीवित व्हावीत, यासाठी तो प्रयत्न करत आहे. आजवर त्याने जुन्या लोकगीतांना सुरांचा नवा साज चढवून गाणी संगीतबध्द केली आहेत. काश्मीरी लोकांबद्दल लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. एकमेकांच्या परंपरा, सकारात्मक बाजू माहीत नसल्याने बरेचदा गैरसमज वाढतात. संगीताच्या माध्यमातून प्रादेशिक दरी भरली जावी, लोक एकमेकांच्या जवळ यावेत आणि संवादाचे पूल बांधले जावेत, असा मानस मजहर सिद्दीकी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.बालगणपती, भालचंद्र, बुध्दिनाथ, एकाक्षर, गजकर्ण, एकदंत, गजानन, गौरीसूत, लंबोदर, महागणपती, मंगलमूर्ती, सिध्दीविनायक अशा अनेक नावांचा समावेश करण्यात आला आहे. २ जानेवारीला हे गाणे सादर करण्यात आले. यूट्यूबवर या व्हिडिओला हजारो हिटस मिळत आहेत आणि संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.  ---------मी मुळचा लखनऊचा आहे. एक-दीड वर्षापूर्वी मी पुण्यात आलो आणि अनेक काश्मीरी तरुणांना भेटलो. मी चार-पाच वर्षांपासून काश्मीरी संगीतावर काम करत आहे. लहानपणापासून घरात गाण्याला अनुकूल वातावरण असल्याने माझी संगीताची आवड जोपासली गेली. वडील मंदिरांमध्ये कीर्तन, प्रवचन ऐकायला घेऊन जायचे. मराठी मित्र असल्यामुळे मराठी गाण्यांचीही गोडी लागली. गणपती ही बुध्दीची देवता मानली जाते. त्यामुळे हे गाणे संगीतबध्द करण्याचा निर्णय घेतला.- मजहर सिद्दीकी----------------एकमेकांच्या धार्मिक सणांमध्ये आपण उत्साहाने सहभागी होतो. अनेक मंडळांचे अध्यक्षही मुस्लिम आहेत. सध्याचा काळ धार्मिक धु्रवीकरणाचा आहे. समाजातील, लोकांमधील विखार वाढत असताना, प्रादेशिक, धार्मिक अस्मिता टोकदार होत असताना संगीताच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचा हा प्रयत्न सकारात्मक आहे. देशभरात संगीतामध्ये होत असलेले प्रयोग दर आठवड्याला यूट्यूब सादर करणार केले जाणार आहेत.- संजय नहार, संस्थापक, सरहद

टॅग्स :PuneपुणेmusicसंगीतMuslimमुस्लीमYouTubeयु ट्यूब