गणेश मंडळांचा गणरायाला ५०० पुस्तकांचा महानैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST2021-09-17T04:15:20+5:302021-09-17T04:15:20+5:30

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, तसेच जय गणेश व्यासपीठाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस ...

Ganesh Mandals offer 500 books to Ganarayana | गणेश मंडळांचा गणरायाला ५०० पुस्तकांचा महानैवेद्य

गणेश मंडळांचा गणरायाला ५०० पुस्तकांचा महानैवेद्य

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, तसेच जय गणेश व्यासपीठाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन केले. या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा उपस्थित होते. तसेच जय जवान मंडळाचे अमोल सारंगकर, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, वीर शिवराज मंडळाचे किरण सोनिवाल, नवज्योत मित्र मंडळाचे अमित जाधव, विधायक मित्र मंडळाचे अभिषेक मारणे, व्यवहारआळी मंडळाचे संतनू पातस्कर, राष्ट्रीय साततोटी मंडळाचे स्वप्निल दळवी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. उपक्रमाची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष पियुष शाह यांची होती. ग्रंथपाल प्रसाद भडसावळे, राजीव पातस्कर, साईनाथ मंडळाचे अमर राव, राजू शेडगे, नंदू ओव्हाळ, गणेश नाईक, प्रतीक निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

-------

Web Title: Ganesh Mandals offer 500 books to Ganarayana