शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

पुण्यातील डॉक्टरांना दवाखाने सुरू करण्यासाठी गणेश मंडळांचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:21 IST

छोटया-मोठया आजारांसाठी व दैनंदिन तपासणीसाठी रुग्णांना मोठया रुग्णालयात जावे लागत आहे.

पुणे : लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी काही दुकाने व व्यवहार सुरु झाले असले, तरी देखील अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु केलेले नाहीत. छोटया-मोठया आजारांसाठी व दैनंदिन तपासणीसाठी रुग्णांना मोठया रुग्णालयात जावे लागत आहे.त्यामुळे खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरु करावे, यासाठी पुण्यातील गणेश मंडळाने पुढाकार घेतला आहे. दवाखान्यात आल्यावर कोणाचाही स्पर्श न होता, स्टँडवरील सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची सोय १५ दवाखाने व पोलीस स्टेशनमध्ये देखील मंडळाने करुन दिली आहे. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे ११ स्टँड खासगी डॉक्टर्स व ४ स्टँड पोलीस स्टेशनला देण्यात आले. यासोबत ५ लीटरचा सॅनिटायझरचा कॅन देखील देण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, डॉ.मिलींद भोई, डॉ.विजय पोटफोडे, डॉ.कुणाल कामठे, डॉ.नितीन बोरा, डॉ.दिनेश बाऊसकर, डॉ.रवींद्र काटकर, डॉ.राजेश दोशी, डॉ.विनोद सातव, आनंद सराफ, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.नितीन झंझाड आदी उपस्थित होते. खडक, फरासखाना, फडगेट व समर्थ पोलीस स्टेशनमध्ये स्टँड देण्यात आले आहेत. 

डॉ.राजेश दोशी म्हणाले, गणेशोत्सव मंडळाने अशी मदत देणे हे कौतुकास्पद आहे. डॉक्टरांनी दवाखाने उघडण्याकरीता दिलेली ही मदत उपयुक्त आहे. सॅनिटायझरच्या बाटलीला हात न लावता पॅडलद्वारे सॅनिटायझर घेणे यामुळे शक्य आहे. त्यामुळे ही साथ पसरण्यास प्रतिबंध देखील घालता येणार आहे. 

अ‍ॅड.नितीन झंझाड म्हणाले, आजमितीस सोशल डिस्टन्सिंग व हात सॅनिटाईज ठेवणे आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणा-या डॉक्टरांना दवाखाने उघडण्यास उद्युक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याकरीता सॅनिटायझेशन स्टँड व ५ लीटर सॅनिटायझर कॅन दवाखान्यांना देत आहोत. त्यामुळे डॉक्टर्स आपले खाजगी दवाखाने उघडून रुग्णांची काळजी घेण्यास पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल