शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांचा निर्धार : देखाव्यांचा खर्च केरळवासीयांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 01:55 IST

गृहोपयोगी वस्तूंचे किट तयार; सोसायटीधारकही सहभागी

पुणे : पुरामुळे केरळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. केरळवासीयांना पुन्हा संसार उभा करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी सर्व स्तरांतून मदतीचा ओघ येत आहे. आता शहरातील नागरिक, सोसायट्या आणि गणेश मंडळांनीही त्यांना आर्थिक मदतीसोबतच संसारोपयोगी वस्तू देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी वस्तूंचे किट तयार केले जात असून, ते मंडळाचे कार्यकर्ते तेथे नेऊन देणार आहेत.

काही तरुणांनी एकत्र येऊन लव्ह केअर शेअर फाउंडेशनतर्फे यापूर्वीच केरळसाठी मदत पाठविली आहे. त्यानंतर तेथे दोन स्वयंसेवकही गेलेले आहेत. तेथील सर्व परिस्थिती त्यांनी पाहिली असून, अजून मदत लागणार असल्याचे जाणवले. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर केरळच्या मदतीसाठी गणेश मंडळेही येत आहेत. अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशनतर्फे अनेक गणेश मंडळांशी संपर्क साधला जात आहे. तसेच, सोसायटीधारकही मदतीसाठी पुढे आले आहेत. अनेक मंडळे त्यांचा देखाव्याचा खर्च आणि डीजेचा खर्च पूरग्रस्तांना देणार आहेत. तसेच विविध संस्थांनी या कामासाठी मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सध्या केरळमधील पाणी ओसरलेले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी अनेक वस्तू लागणार आहेत.त्या वस्तूंची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ब्रश, साबण, पीठ, तांदूळ, मसाला बॉक्स, किचन सेट, बेडशीट, टॉवेल आदी २७ वस्तूंचा समावेश आहे. तसेच, नागरिकांनी किंवा मंडळांनी खाद्यपदार्थ, औषधे, गृहोपयोगी वस्तू, कपडे अशा स्वरूपात मदत करावी, असे आवाहन केले आहे.

लव्ह केअर शेअर फाउंडेशनचे पीयूष शहा म्हणाले, ‘‘केरळमध्ये आम्ही यापूर्वी मदत पाठविली आहे. तसेच स्वयंसेवकही गेले आहेत.तेथे जाऊन त्यांनी आम्हाला अजून मदत लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही गणेश मंडळे, सोसायटीधारकांना आवाहन करीत आहोत, की त्यांनी अधिकाधिक मदत करावी. अनेक मंडळे देखाव्याचा खर्च कमी करून मदत करण्यासाठी सरसावली आहेत.’’दोनशे कुटुंबांकडे सामान पोहोचविणारएर्नाकुलम येथील कुटुंबांना काहीच मदत मिळालेली नाही. त्या ठिकाणी मदत पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेथील सुमारे २०० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे किट देण्यात येईल. एर्नाकुलम येथील चर्च अ‍ॅथॉरिटी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत, असेही पीयूष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेKerala Floodsकेरळ पूर