शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला पराभूत करत गणेश जगताप ठरला जायंट किलर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:29 IST

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अवघ्या मिनिटाच्या आत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला चीतपट करीत गणेश जगतापने शुक्रवारचा दिवस गाजविला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र केसरी स्पर्धेत चंद्रहार पाटील-गणेश जगताप यांच्यातील लढत चांगलीच गाजलीदुसऱ्या लढतीत अभिजित कटके याने शिवराज राक्षे याला केले पराभूत

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अवघ्या मिनिटाच्या आत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला चीतपट करीत गणेश जगतापने शुक्रवारचा दिवस गाजविला. दुसऱ्या अन्य लढतीत जखमी झाल्याने शिवराज राक्षे याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे अभिजित कटके याला विजयी घोषित करण्यात आले. भूगाव येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चंद्रहार पाटील आणि गणेश जगताप यांच्यातील मिनिटभराची लढत चांगलीच गाजली. पाटील याने डावाच्या सुरुवातीला खेमे डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा डाव त्याने चपळाईने उलटवित काही कळायच्या आतच पाटील याला चीतपट केले. त्यावेळी दोघांच्याही खात्यात शून्य गुण होते.

कुस्ती झटपट निकाली लागल्याने, चांगला खेळ पाहण्यासाठी आलेल्या कुस्ती प्रेमींची काहीशी निराशा झाली. मात्र, गणेशने तुलनेने अनुभवी असलेल्या कसदार मल्लाविरोधात दाखविलेली चपळाई चर्चेचा विषय झाली. चंद्रहार पाटील याने या पूर्वी २००७ आणि २००८ साली महाराष्ट्र केसरी किताबावर मोहोर उमटविली होती. यंदाच्या स्पर्धेत देखील विजेतेपदाचा दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. पाटील याला नमवित जगताप जायंट किलर ठरला. 

दुसऱ्या लढतीत अभिजित कटके याने शिवराज राक्षे याला पराभूत केले. कटकेने सुरुवातीपासूनच अक्रमक खेळ करीत आपले इरादे स्पष्ट केले. त्याने दुहेरी पट काढत त्याच्यावर ताबा मिळविला. त्यानंतर भारंदाज डावावर ७ गुणांची अघाडी घेतली. मात्र खेळताना राक्षेच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्यानंतर त्याने माघार घेतल्याने कटके याला विजयी घोषित करण्यात आले.

शुक्रवारी (आज) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात लढत होईल. कटके देखील विजयाचा दावेदार मानला जात असल्याने, या लढतीकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Puneपुणे