विजयचा डबल धमाका.. सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी

By admin | Published: January 11, 2016 12:00 AM2016-01-11T00:00:00+5:302016-01-11T00:00:00+5:30

चुरशीच्या अंतीम सामन्यात केवळ १५ सेकंद बाकी असताना जळगावच्या विजयने मुंबईच्या विक्रांतला चितपट केले.

कुस्तीतील मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकविणाऱ्या मल्लास यापुढे पोलीस खात्यात थेट नोकरी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपप्रसंगी केली.

माती विभागात सोलापूर जिल्हा आणि गादी विभागात कोल्हापूर जिल्हा संघाने येथे रविवारी संपलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपदाचा मान मिळविला. अहमदनगरचा केवल भिंगारे हा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मल्ल ठरला.

नागपुरातील चिटणीस पार्कवर रविवारी संपलेल्या ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जेतेपदाचा मानकरी ठरलेला जळगावचा विजय चौधरी याला प्रतिष्ठेची चांदीची गदा प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

पराभूत मल्लाला प्रेक्षकांनी डिवचल्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट लागले. या हाणामारीत काही मल्लांसह त्यांचे समर्थक किरकोळ जखमी झाले. दंगलखोर प्रेक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येवढी घटना सोडता ही स्पर्धा अतीशय चांगल्या पद्धतीने पार पडली असल्याची माहीती समोर आली आहे.

महिनाभरापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या चाचणीत विजय चौधरीला धूळ चारणाऱ्या विक्रांतनेदेखील एक गुण संपादन करताच विजयचे चार तर विक्रांतचे तीन गुण होते. या वेळी अखेरचे ३० सेकंद शिल्लक असताना विक्रांतने फ्रंटकडून ‘सालटो’डाव टाकण्याचा प्रयत्न केला.

माती गटात गतमहाराष्ट्र केसरी जळगावच्या विजय चौधरीने सोलापूरच्या बाला रफिक शेख याला सव्वादोन मिनिटांच्या थरारक लढतीत चीत केले.

गतविजेता आणि अनुभवी मल्ल जळगावचा विजय चौधरी याने निर्णायक लढतीत पूर्व मुंबईच्या विक्रांत जाधव याला चारीमुंड्या चित करीत दुसऱ्यांदा मानाचा‘ महाराष्ट्र केसरी’ सन्मान राखला.