देऊळगाव उपसरपंचपदी गणेश जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST2021-03-30T04:09:44+5:302021-03-30T04:09:44+5:30
दौंड तालुक्यातील नाभिक समाजाचा जो कोणी व्यक्ती जर ग्रामपंचायत स्तरावर पदावरती काम करीत असेल वा सदस्य असेल अशा व्यक्तीच्या ...

देऊळगाव उपसरपंचपदी गणेश जाधव
दौंड तालुक्यातील नाभिक समाजाचा जो कोणी व्यक्ती जर ग्रामपंचायत स्तरावर पदावरती काम करीत असेल वा सदस्य असेल अशा व्यक्तीच्या पाठीवर एक प्रकारची शाबासकीची थाप पडावी व याच्या माध्यमातून गावामध्ये आणखी विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रेरणा मिळावी हे या मागचा हेतू आहे. या कार्यक्रमा प्रसंगी दौंड तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष गणेश साळुंके, पुणे जिल्हा कोशाध्यक्ष मारुती पंडित, तालुका सचिव रवींद्र गायकवाड, नानासो पवार, बाळासाहेब पंडित, आंनद जाधव,
सचिन थोरात, निलेश जाधव, ज्ञानदेव जाधव, सुभाष जाधव उपस्थित होते.
---
फोटो क्रमांक : २९खोर
फोटोओळ : देऊळगावगाडा(ता.दौंड) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गणेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल दौंड तालुका नाभिक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.