शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव ही सामाजिक परंपरा : मुक्ता टिळक, कृतज्ञता सेवा पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:47 IST

गणेशोत्सव मंडळाचे हे सामाजिक योगदान मोठे आहे. त्यामुळे गणेशोत्सव ही एक सामाजिक परंपरा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. 

पुणे : पुण्यात दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु विसर्जन मिरवणूक झाली की सर्व कार्यकर्ते थेट पुढच्या गणेशोत्सवातच एकत्र येतात. परंतु, काही गणेशोत्सव मंडळे वर्षभर समाजासाठी काम करत असतात. त्यामुळे समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचते. गणेशोत्सव मंडळाचे हे सामाजिक योगदान मोठे आहे. त्यामुळे गणेशोत्सव ही एक सामाजिक परंपरा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले. अकरा मारुती चौक गणेशोत्सव मंडळ, सत्येश्वर मित्र मंडळ, राष्ट्रीय कला अकादमी न्यास यांच्या वतीने विनायक महादेव रेणुसे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सेवा पुरस्कार टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष विनायक घाटे, वैभव रेणुसे, संकेत जाधव, मिलिंद घाटे, कौस्तुभ वैद्य, ऋषी घाटे, सिद्धेश घाटे, प्रथमेश घाटे आदी यावेळी उपस्थित होते. लुई ब्रेल अंध अपंग कल्याणाकारी संस्थेच्या नूतन केंद्रे आणि वंचित विकास संस्थेच्या आरती तरटे यांना कृतज्ञता सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या कोटणीस दवाखान्यातील महिला कर्मचारी आणि पुरुष सेवार्थींचा सन्मान यावेळी करण्यात आला. आनंद सराफ म्हणाले, ‘समाजासाठी झटणारे अनेक हात आहेत. त्यांची दखल घेऊन सन्मानित करणे ही एक सेवाच आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दवाखाने या ठिकाणी काम करताना कर्मचारी आपले कुटुंब मागे ठेवून सेवाभावाने आपले कर्तव्य निभावत असतात. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.’

शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPuneपुणे