शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गणेश महोत्सव 2019: उत्साही भाविकांना रस्ते पडले अपुरे ; आरास पाहण्यास प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 12:18 IST

सायंकाळी सहा नंतर जिवंत देखावे, पौराणिक देखावे, आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले..

ठळक मुद्देसमाजप्रबोधन करणारे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे अधिक

पुणे: गणेशोत्सवाचे अवघे चार दिवस राहिले असताना रविवारच्या सुट्टीची संधी साधत पुणे शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या उत्साही भाविकांनी शहरातील मध्य वस्तीतील रस्ते फुलेले असून या गदीर्ला रस्ते अपुरे पडल्याचे दिसून येत होते़ शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, नाना पेठ, भवानी पेठ भागात अनेक मंडळांनी वैविध्यपूर्ण देखावे केले आहेत. तर यंदा समाजप्रबोधन करणारे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखाव्याचे प्रमाण अधिक आहे. सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात देखावे, गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही पेठासहित उपनगरातून नागरिक अतिशय उत्साहाने मंडळांची आरास पाहण्यासाठी येत होते़  खेळणी, टोप्या, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ स्टॉल, चैनीच्या वस्तूंचे स्टॉल मोठया प्रमाणावर दिसून आले. या स्टॉलवर अनेक महिला, लहान मुले वस्तू खरेदी करताना दिसून येत होत्या. मंडई, बाबू गेनू यांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक तासनतास रांगेत उभे राहिले होते. सायंकाळी सहा नंतर जिवंत देखावे, पौराणिक देखावे, आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले. जिवंत देखाव्यातून सामाजिक संदेश मिळत होता तर काही ठिकाणी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती मिळत होती. शिवाजी महाराजांचा देखावा पाहताना शिवाजी महाराज की जय असा जयघोष नागरिक करत होते. समाजप्रबोधन करणाºया देखाव्यांना नागरीकांकडून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. पौराणिक देखाव्यातही पाहण्यात लोकांचा आनंद दिसत होता. विद्युत रोषणाई करणाºया मंडळांसमोर नागरिक गाण्याचा आनंद लुटत होते. हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर चालणारी रंगबेरंगी एलईडी लाईट्स पाहून नागरिक नाचण्याचा आनंद लुटत होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा घोष सर्वत्र ऐकू येत होता. रस्त्यावर पिपानीचे आवाज, लहान मुलांच्या हातातील फुगे यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पौराणिक देखावे पाहण्यासाठी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच उत्सुकतेने सहभागी झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढणे, सेल्फी काढणे, फोटो काढणे याला जास्त प्राधान्य देण्यात आले. प्रमुख रस्त्यावरील कॅफे, हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पेठांमध्ये बºयाच मंडळांनी आकर्षक महाल, मंदिरे उभारली आहेत. हे पाहण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मधूनच येणारी पावसाची भुरभुरही या उत्साहाला रोखू शकत नव्हती़ 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव