माल परस्पर घेऊन दुकानदाराला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:00 IST2021-02-05T05:00:16+5:302021-02-05T05:00:16+5:30

पुणे : काही रक्कम ॲडव्हान्स देऊन माल पोहचल्यावर सर्व पैसे देत असल्याचे सांगून वाटेत दुसऱ्या टेम्पोत माल भरून घेऊन ...

Ganda to the shopkeeper by taking the goods to each other | माल परस्पर घेऊन दुकानदाराला गंडा

माल परस्पर घेऊन दुकानदाराला गंडा

पुणे : काही रक्कम ॲडव्हान्स देऊन माल पोहचल्यावर सर्व पैसे देत असल्याचे सांगून वाटेत दुसऱ्या टेम्पोत माल भरून घेऊन दुकानदाराची एकाने २ लाख ३ हजार रुपयांना गंडा घातला.

याप्रकरणी कुणाल महेंद्र ओसवाल (रा. शंकरशेठ रोड) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ओसवाल यांचे न्यू टिंबर मार्केटमध्ये केसरी याडेकोर या नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात अमित जाधव असे नाव सांगणारी व्यक्ती आली. त्याने दुकानातील १ लाख ४८ हजार रुपयांची ऑर्डर दिली. बिलापैकी १० हजार रुपये ॲडव्हान्स दिला. उर्वरित रक्कम माल पोहोचल्यावर देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आणखी ९२ हजार ८०० रुपयांची ऑर्डर करून दोन्ही ऑर्डरची रक्कम २ लाख ३० हजार रुपये माल पोहोचल्यावर देतो, असे सांगितले. त्यानुसार ओसवाल यांनी माल भरून टेम्पो पाठविला. त्यानंतर जाधव याने तो माल दुसऱ्या टेम्पोमध्ये भरून घेऊन फरार झाला व मोबाईलही बंद करून फसवणूक केली.

Web Title: Ganda to the shopkeeper by taking the goods to each other