गणपती माझा नाचत आला..!
By Admin | Updated: August 30, 2014 01:55 IST2014-08-30T01:55:16+5:302014-08-30T01:55:16+5:30
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष.. ढोल-ताशांचा गजर.. सनई चौघड्याचे मंगलमयी सूर... आबालवृद्धांचा ओसंडून वाहणारा उत्साह..

गणपती माझा नाचत आला..!
वाशिम : येथील राजे वाकाटक वाचनालय आणि संस्कारभारती शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक मूर्ती कार्यशाळेत ११७ जणांनी सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेच्या माध्यमातून मूर्तिकार व संस्कार भारतीचे पुरुषोत्तम मुंधरे, अनिल मुंधरे यांनी सहभागी सदस्यांना मूर्ती निर्मितीविषयी मार्गदर्शन केले.सहभागी सदस्यांमध्ये गृहिणी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कार्यशाळेत मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती नागपूरवरुन आणण्यात आली होती. माती भिजवून तिचा एक गोळा प्रत्येक सहभागी सदस्यांना देण्यात आला. जवळपास तीन तास चाललेल्या या कार्यशाळेत आपल्यातील संपूर्ण कसब पणाला लावून मूर्तीकलेला आत्मसात करण्याचे काम केले. या कार्यशाळेचे संचालन अमोल काटेकर व आरती बावणे यांनी केले. यावेळी मूर्तिकार पुरुषोत्तम मुंधरे, अनिल मुंधरे यांच्यासह डॉ. जयंत अहाळे यांचा सत्कार करण्यात आला. पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना आपल्या घरासह इतरही घरी कशी करता येईल, याबाबत जागरुक राहून प्रबोधन करण्याचे आवाहन संस्कार भारतीचे अमोल काटेकर यांनी केले. स्वत:च बनविलेल्या मूर्ती घरी घेऊन जाणार्या कार्यशाळेतील सहभागी सदस्यांचा उत्साह त्यांच्या चेहर्यांवर ओसंडून वाहत होता.