गुलाब उत्पादकांची लगबग

By Admin | Updated: December 25, 2015 01:43 IST2015-12-25T01:43:04+5:302015-12-25T01:43:04+5:30

एक - दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ला गुलाब फुलांच्या वाढत्या मागणीमुळे फूल उत्पादक शेतकरी उत्पन्नवाढीकडे अधिक लक्ष देत आहेत.

Gambling growers | गुलाब उत्पादकांची लगबग

गुलाब उत्पादकांची लगबग

टाकवे बुदु्रक : एक - दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ला गुलाब फुलांच्या वाढत्या मागणीमुळे फूल उत्पादक शेतकरी उत्पन्नवाढीकडे अधिक लक्ष देत आहेत. या गुलाबाच्या फुटव्यासाठी रोपाचे बेडिंग केले जात असून, औषध फवारणी केली जात आहे. फुलांना स्थानिक बाजारपेठांसह परदेशांतही मोठी मागणी असते.
गुलाबाची फुले परदेशातही पुरवली जातात. बाराही महिने या फुलांना मागणी असते. या फुलांना सर्वाधिक मागणी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात असते. २० जानेवारीच्या सुमारास फुलांची निर्यात सुरू होते. स्थानिक बाजारपेठेत जानेवारीत मागणी वाढते. त्यामुळे फूल शेतकरी आता जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी बेडिंगचे काम करीत आहेत.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या आसपास योग्य आकारात उंची व आकारात फुलाचे पीक घेता येईल, याचे नियोजन शेतकरी करत आहेत.
बेडिंगनंतर ४० ते ४५ दिवसांत रोपाची वाढ पूर्ण होऊन फुले काढणीला येईल, याची दक्षता घेतली जाते. यासाठी पुरेशा प्रमाणात खताची मात्रा, कीटकनाशक फवारणी, पाणी दिले जाते. (वार्ताहर)

Web Title: Gambling growers