शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड गजा मारणे व साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:40 IST

गुन्हयाच्या पुढील तपासासाठी आरोपींना अटक करणे गरजेचे आहे,

पुणे : गुन्हयाच्या पुढील तपासासाठी आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद मान्य करीत न्यायालयाने तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोणे यांनी हा आदेश दिला.

गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रूपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय ३४), गणेश नामदेव हुंडारे (३९), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७), सचिन अप्पा ताकवले (वय ३२) आणि संतोष शेलार अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. मारणे याच्या जामिनाला सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

दरम्यान, या आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात देखील अटकपूर्व जामिनाचा अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोपींनी रॅली काढली. रॅलीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले. आरोपींनी चार जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावले आहेत. मारणे व त्याचा साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीत. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अँड. कावेडिया यांनी केला.-----------------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWarje Malwadiवारजे माळवाडीCourtन्यायालय