गौरी समोर गजलक्ष्मी हलता देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:10 IST2021-09-13T04:10:28+5:302021-09-13T04:10:28+5:30
भोर तालुक्यातील भोलावडे गावाच्या हद्दीत असलेल्या किरवे ऑईल मिल येथील चंचला किरवे यांच्या घरी गजलक्ष्मी गौरी समोर गजलक्ष्मी हा ...

गौरी समोर गजलक्ष्मी हलता देखावा
भोर तालुक्यातील भोलावडे गावाच्या हद्दीत असलेल्या किरवे ऑईल मिल येथील चंचला किरवे यांच्या घरी गजलक्ष्मी गौरी समोर गजलक्ष्मी हा हालता देखावा सादर केला आहे. याची संकल्पना व सजावट चंचल किरवे माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे व कल्पना किरवे, साक्षी किरवे यांची आहे. गौरीसमोर फिरते कमळ तयार केले असून ढोल वाजवणारा हत्ती, घंटा वाजवणारा व पिपाणी वाजवणारा हत्ती, हत्तीवर उंदीर हा हालता देखावा तयार केला आहे. पितळी भांडी असून फुलांच्या माळांची सजावाट तयार करण्यात आली आहे.
इतर वेळी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी गौरी सणाला चार दिवस एकत्र राहून गौरीची आरास म्हणून विविध देखावे तयार करण्याचा छंद आहे. उत्साहात गौरी सण साजरा केला जात असल्याचे माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे चंचल किरवे व कल्पना किरवे यांनी सांगितले.