घरात वेश्याव्यवसाय चालवणारी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST2021-07-30T04:10:53+5:302021-07-30T04:10:53+5:30

संगीता संजय भोईटे (वय ४७, रा. नारायणगाव, कोल्हेमळा रोड) असे अटक करण्यात प्रमुख आरोपी महिलेचे नाव आहे. कोल्हेमळा ...

Gajaad, a woman who runs a prostitution business at home | घरात वेश्याव्यवसाय चालवणारी महिला गजाआड

घरात वेश्याव्यवसाय चालवणारी महिला गजाआड

संगीता संजय भोईटे (वय ४७, रा. नारायणगाव, कोल्हेमळा रोड) असे अटक करण्यात प्रमुख आरोपी महिलेचे नाव आहे. कोल्हेमळा रस्ता येथे ग्रामीण रुग्णालयासमोर संगीता भोईटे ही स्वतःच्याच घरात गिऱ्हाईक बोलावून इतर महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना बुधवारी (दि. २८) मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, घरातून तीन महिला मिळून आल्या. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, संगीत भोईटे ही ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले व मिळालेल्या पैशातून ठरावीक रक्कम घर मालकीण संगीता हिला देत असत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणलेल्या महिलांना मुंढव्यातील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, दिनेश साबळे, रंजना मेचकर, धनंजय पालवे, सचिन कोमल, शैलेष वाघमारे, आकाश खंडे या पथकाने केली आहे.

Web Title: Gajaad, a woman who runs a prostitution business at home