रेल्वे पोलिसांचे दोन लिपिक लाच घेताना गजाआड
By Admin | Updated: November 11, 2014 23:58 IST2014-11-11T23:58:01+5:302014-11-11T23:58:01+5:30
सेवानिवृत्त पोलिसाच्या निवृत्ती वेतनाचे काम करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना लोहमार्ग पोलिसांच्या दोन लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आले.

रेल्वे पोलिसांचे दोन लिपिक लाच घेताना गजाआड
पुणो : सेवानिवृत्त पोलिसाच्या निवृत्ती वेतनाचे काम करण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना लोहमार्ग पोलिसांच्या दोन लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आले. संगम पुलाजवळील लोहमार्ग अधीक्षक कार्यालयामध्ये ही कारवाई करण्यात आली.
मनोज रमेश वाघेला (वय 38) आणि सुदेश लक्ष्मणराव पाटील (वय 53) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस आहेत. त्यांचे पेन्शनचे काम रेल्वे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये प्रलंबित होते. हे काम मार्गी लावण्यासाठी प्रमुख लिपिक पाटील आणि वरिष्ठ लिपिक वाघेला यांनी लाचेची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आल्यानंतर, लोहमार्ग अधीक्षक कार्यालयामध्ये सापळा लावण्यात आला. या दोघांनाही पाच हजारांची लाच घेताना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रंगेहाथ पकडण्यात आले.(प्रतिनिधी)