शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांपेक्षा गडचिरोलीचे आदिवासी जास्त सुशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:33 IST

केंद्रीय राखीव दलाची कंपनी पुण्यातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी आली आहे़.

ठळक मुद्देकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांचे मत

पुणे : लोकशाहीमधील मतदान हे आद्य कर्तव्य म्हटले जाते़ पण ते करण्यास शहरी मतदार फारसा उत्सुक दिसून येत नाही़. आम्ही गडचिरोली, नागपूर आणि पुण्यात मतदानाचा बंदोबस्त केला़. नक्षलवाद्यांच्या बंदुकीचा धाक असतानाही जे उत्स्फूर्तपणे मतदानाला येतात. ते गडचिरोलीचे आदिवासी पुणेकरांपेक्षा जास्त सुशिक्षित असल्याचे निरीक्षण उत्तर प्रदेशातून आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानांनी नोंदविले़. केंद्रीय राखीव दलाची कंपनी पुण्यातील मतदानाच्या बंदोबस्तासाठी आली आहे़. शहरातील काही संवेदनशील मतदान केंद्रांवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती़. त्यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला़ तेव्हा ते म्हणाले, आम्ही उत्तर प्रदेशातील आहोत़. यापूर्वी आम्ही गडचिरोली व नागपूरला बंदोबस्तावर होतो़ पाच दिवसांपूर्वी पुण्यात आलो़. गडचिरोलीतील आदिवासी भाग नक्षलग्रस्त असल्याने त्या ठिकाणी खूपच सतर्क राहावे लागत होते़.. संपूर्ण दिवस लक्ष ठेवावे लागत होते़. मात्र, तेथील लोक अगदी शिस्तीत येत होते़ येणाऱ्यामतदारांकडे त्याचे मतदान कोठे आहे, याची त्यांना माहिती होती़. ते सरळ येऊन रांगेत उभे रहात होते़ तेथे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होते़. त्याच्या आत सर्वच आले होते़ त्यांना काही सांगावे लागले नाही़ नक्षलवाद्यांची भिती असतानाही तेथे मोठे मतदान झाले़. त्याच्या पूर्णपणे विरुद्ध परिस्थिती पुण्यात आले़ येथे बंदोबस्ताचा ताण नव्हता़ काही वेळ विश्रांतीही मिळत होती़. पण, येथे येणाºया मतदारांकडे त्यांचे मतदान कोठे आहे, याची माहिती नव्हती़. अनेकांकडे त्यांचे मतदान कोठे आहे, याची स्लीपही नव्हती़. त्यांना सांगावे लागत होते़ काही जणांना त्यांचे नाव सापडत नव्हते़. येथे लोक सुशिक्षित असूनही पुरेशी माहिती न घेता मतदान केंद्रावर येत होते़. येथे सहा वाजेपर्यंत वेळ असतानाही मतदान कमी झाले़ काही जण तर सहा वाजल्यानंतरही धावत येताना दिसत होते़. त्यांना मतदान करता आले नाही, असे त्यांनी मत नोंदविले़. यापुढे २९ एप्रिलला पुण्यातच मतदानासाठी आमची नेमणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले़. 

टॅग्स :PuneपुणेGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक