मराठी भाषेचे भवितव्य चिरंजीव व चिरंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:20+5:302021-03-04T04:17:20+5:30

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर, येथे मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व वि. ...

The future of Marathi language is eternal and everlasting | मराठी भाषेचे भवितव्य चिरंजीव व चिरंतन

मराठी भाषेचे भवितव्य चिरंजीव व चिरंतन

समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय लोणी काळभोर, येथे मराठी विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. कुरणे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी साहित्यिक रत्न प्रतिमांचे अनावरण याबरोबरच माय मराठी स्वाक्षरी उपक्रम तसेच ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या कवी सुरेश भटांच्या संगीतमय काव्य वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. या सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार घोडके यांनी केले, तर प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब जगताप यांनी केले. ग्रंथ प्रदर्शनासाठी ग्रंथपाल शेख मॅडम यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शासनाच्या कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत निवडक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Web Title: The future of Marathi language is eternal and everlasting