‘भीमाशंकर’चे भवितव्य मतपेटीत बंद
By Admin | Updated: June 8, 2015 05:15 IST2015-06-08T05:15:40+5:302015-06-08T05:15:40+5:30
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज ६५.९७ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील ११ हजार ५१४ मतदारांपैकी ७५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

‘भीमाशंकर’चे भवितव्य मतपेटीत बंद
मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज ६५.९७ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील ११ हजार ५१४ मतदारांपैकी ७५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शांततेत मतदान पार पडले.
मंचर शहरातील मतदान केंद्रावर दुपारच्या वेळी रांगा लागल्या होत्या. कारखान्याचे संस्थापक माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सकाळी मंचर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काठापूर येथे मतदान केले.
आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी मतदानाला वेग नव्हता. नंतर तो वाढला. मतदारांना आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. काही मतदार हे वयस्क असल्याने व जास्त मतदान असल्याने मतदानास वेळ लागत होता. त्यामुळे रांगा लावून अनेक मतदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भीमाशंकर सहकार पॅनल व शिवसेना पुरस्कृत भीमाशंकर शेतकरी सहकार पॅनल यात लढत झाली आहे. दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदान केंद्रांना भेटी देत होते.
कारखान्याचे संस्थापक माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सकाळी मंचर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. खासदार शिवाजीराव
आढळराव पाटील यांनी काठापूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानाच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंचर शहरात तीन मतदान केंद्रे होती. ब गट सहाकरी संस्था गटात ९३ मतदारांपैकी ८६ मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला. ९२ टक्के मतदान झाले आहे. इतर १९ व २० या दोन केंद्रांवर १०६३ मतदारांपैकी ६६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाहेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दिवसभर बसून होते. दरम्यान, उद्या सोमवारी मंचर येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. (वार्ताहर)