शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ज्येष्ठांच्या एकटेपणावर ‘मदतनिसा’ची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:42 AM

वृद्धांना मदतीचा हात : स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

- प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : एकटेपणा भल्याभल्यांनाही नैराश्याच्या गर्तेत ढकलतो, तिथे ज्येष्ठांची काय कथा? ज्यांना अंगाखांद्यावर खेळवण्यात, ज्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात पूर्ण हयात गेली, ती पिल्ले आपापल्या आयुष्यात विसावतात व आई-वडील मात्र पूर्ण एकटे पडतात. वृद्धांच्या आयुष्यातील एकटेपणाच्या दु:खावर ‘मदतनिसा’ची फुंकर सुखद झुळूक ठरत आहे. ज्येष्ठांना मदतनिसाच्या माध्यमातून मदतीचा हात देता यावा, यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी कंबर कसली आहे.

महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १ कोटी २१ लाख रुपये आहे; तर, पुण्यात सुमारे पाच ते सहा लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यांच्यापैकी अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. बहुतांश ज्येष्ठांची मुले-मुली शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त परदेशी किंवा अन्य शहरांमध्ये स्थिरावलेली असतात. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील कामे पार पाडणेही अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना अवघड होऊन बसते. दुकानातून लहान-मोठ्या वस्तूंची खरेदी, डॉक्टरांकडील तपासणी, औषधोपचार, बिल भरणे अशा अनेक कामांमध्ये त्यांना मदतीची गरज असते. त्यांची हीच अडचण आणि गरज लक्षात घेऊन पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

श्री सद्गुरू ग्रुप या संस्थेतर्फे सभासद ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी, सोबतीसाठी आपणहून पुढाकार घेतात. सध्या संस्थेचे ४००० सभासद असून, गेल्या पाच वर्षांपासून ज्येष्ठांना मदतनीस पुरवण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. महिन्याभरात साधारणपणे दहा-बारा ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जात असल्याचे सहसचिव वासुदेव जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एकेकट्या ज्येष्ठांना बरेचदा एकाकीपण जाणवते. गप्पा मारण्यासाठी, सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी, वाचन करून दाखवण्यासाठी त्यांना सोबतीची गरज असते. मदतनिसांच्या माध्यमातून त्यांची गरज पूर्ण केली जाते. विश्वासू मदतनिसांचीच निवड केली जात असल्याने फसवणुकीची शक्यता राहत नाही. संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.१०९० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध

  • पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण कक्षातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनिसाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी १०९० हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • ज्येष्ठांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास त्यांच्यांशी गप्पा मारणे, सिलिंडर जोडून देणे, दवाखान्यात घेऊन जाणे, वाचन करून दाखवणे आदी कामांसाठी मदतनिस म्हणून मार्शल पाठवले जातात.
  • दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, मदतीसाठी महिन्यातून साधारणपणे ३०-३५ फोन असल्याचे पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
  • अ‍ॅमेनोरा येस फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी क्षुधा शांती अभियान हाती घेतले आहे. फाउंडेशनतर्फे गरीब, असहाय, आजारी असणाऱ्या वृद्धांना घरपोच जेवणाचा डबा मोफत दिला जाणार आहे. घरातील एक जण आजारी असेल, तर दुसरा बाहेर जाऊन काही आणू शकत नाही की बनवू शकत नाही. बरेचदा खानावळीचा किंवा हॉटेलचा डबाही परवडत नाही पण भीक मागू शकत नाही. अशा कुटुंबांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रारंभीच्या टप्प्यात सदाशिव पेठ, नारायण पेठ, सिंहगड रोड, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण आदी ठिकाणी सुविधा पुरवली जाईल, असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.