शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महापालिकेच्या नव्या इमारतीत फर्निचर, एसीचाच खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 02:27 IST

शिल्लक कामांसाठी साडेबारा कोटींच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव

पुणे : पाणीगळती व अन्य अनेक कारणामुळे गाजत असलेल्या महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचा खर्च आतापर्यंत तब्बल ५४ कोटींच्या घरात पोहोचला आहे. या इमारतीला बांधकामासाठी २६ कोटींचा खर्च झाला असून, सभागृह, पदाधिकाऱ्यांची कार्यालये, विविध समित्यांची कार्यालयांचे फर्निचर, वातानुकूलन यंत्रणा, लिफ्ट, प्रोजेक्टर यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. यामध्ये आता आणखी वाढ होणार असून, शिल्लक कामांसाठी निधी कमी पडत असल्याने प्रशासनाने शहरातील विकास कामांचा निधी कमीकरून तब्बल साडेबारा कोटी रुपयांचा निधी या कामांसाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे. येत्या सोमवारी(दि. ५) होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेली जागा कमी पडत असल्याने शेजारी असलेल्या रिकाम्या जागेत नवीन विस्तारित इमारत बांधण्यात आली आहे. सुमारे १४ हजार चौरस मीटर क्षेत्रांवर चार मजली इमारत बांधली आहे. या इमारतीसाठी २६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा खर्च वाढत वाढत ५४ कोटींवर पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीत ७२ फूट व्यासाचे गोल घुमटाचे सभागृह आहे. या इमारतीमध्ये महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते विविध पक्षांच्या गटनेत्यांची कार्यालये, तसेच समित्यांच्या अध्यक्षांची कार्यालये आहेत. यासाठी आवश्यक असलेले फर्निचर तसेच विद्युतविषयक कामे करण्यासाठी सुमारे २८ कोटींचा खर्च झाला आहे.या इमारतीत अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवून कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली होती. ही कामे पूर्ण झाली असून झालेल्या कामाचे बिल देण्यासाठी भवन विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे वर्गीकरणाद्वारे १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.असा झाला इतर खर्चमुख्य सभागृह फर्निचर : १ कोटी ४ लाखपदाधिकारी कार्यालय फर्निचर : २ कोटी ५० लाखजीआरसी डोम आणि इतर कामे : ४ कोटी ६ लाखडोम सुशोभीकरण, इतर कामे : १ कोटी ७३ लाखफायर फायटिंग कामे : १ कोटी २४ लाख

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे