शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नातेवाईकांकडून सासरच्या घरासमोरच आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 22:04 IST

सासरच्या लोकांनीच मुलीला मारल्याचा आरोप ; बारामती तालुक्यातील घटना

बारामती (सांगवी) : विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या गीतांजली अभिषेक तावरे या विवाहित महिलेच्या संतप्त नातेवाईकांकडून टाहो फोडत सासरच्या दारासमोरच पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी विवाहितेने विष प्राशन केल्यानंतर पुण्यात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (२७ रोजी ) मृत्यू झाल्या नंतर सांगवी येथे सासरच्या दारात आणल्यानंतर माहेरकडील नातेवाईकांनी अंत्यसंस्कार प्रसंगी गोंधळ घातल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पुढे गावातील काही अनर्थ घडून येऊ न देण्यासाठी गावातील व सासरकडील लोकांनी दारात अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

सांगवी (ता. बारामती ) येथील गितांजली अभिषेक तावरे या विवाहित महिलेने विष प्राशन करून जीवन संपविले. वारंवार पैसा व सोन्याची मागणी केल्यावर वर्षभरात १५ लाख रूपये व २५ तोळे सोने व इतर सर्व गोष्टीची पूर्तता करून देखील पुन्हा मृत गीतांजलीकडे तगादा लावला होता. मात्र, यावेळी ५० तोळे सोन्याची मागणी पूर्ण न झाल्याने आमच्या मुलीला सासरच्या लोकांनीच विष पाजून, इंजेक्शन देऊन मारल्याचा खळबळजनक आरोप मृत महिलेची चुलती नमिता अरुण यादव (रा.गूरसाळे ता.माळशिरस ) व नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. मृत गीतांजलीचे नातेवाईक सासरच्या लोकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीSangviसांगवीPoliceपोलिसWomenमहिला