शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 22:14 IST

पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.अंत्यविधीपूर्वी असणारे विधी देखील करण्यात आले. त्या ठिकाणी शोकसभादेखील घेण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचा मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यास विरोध

बारामती :  बारामती तालुक्यात मराठा मोर्चाचे आंदोलन दिवसेंदिवस पेटत असून आज तिसऱ्या दिवशी पिंपळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीपूर्वी असणारे विधी देखील करण्यात आले. त्या ठिकाणी शोकसभादेखील घेण्यात आली. हा मोर्चा मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजासह सर्व समाजबांधवांनी काढला. त्या ठिकाणी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा समाज आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले; मात्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे आता समाजाने ठोक मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे.सोमवार (दि. २३)पासूनच बारामती परिसरात आंदोलन पेटत आहे. प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करीत असताना पोलीस प्रशासनाने मज्जाव करून पुतळ्याचे दहन करण्यास विरोध केला. पुतळ्याचे दहन करू न देता पुतळा ताब्यात घेतला. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध नोंदवला.या वेळी विकास बाबर म्हणाले, ‘‘हे सरकार आरक्षण व शेतकरी विरोधी आहे. मराठा समाज सनदशीर मार्गाने मागण्या मागत असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. काहींनी कट रचून दोन समाजांत बारामतीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मनुवादी प्रवृत्तीचा, घटनेचा जाहीर निषेध करीत आहे. संविधानिक पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले आरक्षण होते. ते हक्काचे आरक्षण आम्हाला मिळावे, ही आम्ही सर्व समाजबांधवांच्या वतीने मागणी करीत आहे. तसेच, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या आंदोलनाला भाजपा विरहित सर्व पक्षसंघटनांनी पाठिंबा दिला.  यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुनील बनसोडे व बसपा  महासचिव दादा थोरात आदींनी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे; तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, छत्रपती शिवाजी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारावे आदी मागण्या केल्या. तसेच, मराठा क्रांती मोर्चातील आरक्षणासह सर्व प्रमुख मागण्यांना सशर्त पाठिंबा दिला.यावेळी संतोष ढवाण, रमेश ढवाण, सूर्यकांत पिसाळ, सतीश काटे, शाहरुख इनामदार आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पिंपळीगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश देवकाते यांनी आभार मानले.

टॅग्स :BaramatiबारामतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस