दिशादर्शकासाठी निधीचा अपव्यय

By Admin | Updated: June 18, 2015 00:04 IST2015-06-18T00:04:18+5:302015-06-18T00:04:18+5:30

जुने दिशादर्शक फलक सुस्थितीत असूनही नवीन दिशादर्शक लावून निधीचा अपव्यय करण्यात आला आहे. नवीन दिशादर्शक अतिउंचावर बसविण्यात

Fundraising the funds for the direction | दिशादर्शकासाठी निधीचा अपव्यय

दिशादर्शकासाठी निधीचा अपव्यय

धनकवडी : जुने दिशादर्शक फलक सुस्थितीत असूनही नवीन दिशादर्शक लावून निधीचा अपव्यय करण्यात आला आहे. नवीन दिशादर्शक अतिउंचावर बसविण्यात आले असल्याने त्यावरील मजकूर वाचणेही अवघड असल्याने नव्याने करण्यात आलेली उपाययोजना कुचकामी असल्याचे दिसून येत आहे.
पोस्ट कार्यालयापासून ते भारती विद्यापीठामागील त्रिमूर्ती चौकाच्या दरम्यान उंचावर बसवण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाबाबत राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन क्षेत्रीय कार्यालयात देण्यात आले आहे.
या रस्त्यावर नव्यानेच लावण्यात आलेले दिशादर्शक फलक उंच खांबावर लावण्याबरोबरच त्यावरील लिखाण हे छोट्या अक्षरात लिहिले असल्याने ते नागरिकांना व्यवस्थित दिसत नाही. जुने दिशादर्शक फलक सुस्थितीत असताना नवीन दिशादर्शक बसवून निधीचा अपव्यय करण्यात आल्यामुळे आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद अरसूळ यांच्या वतीने धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुकुमार पाटील यांना देण्यात आले.
याप्रसंगी माऊली दारवटकर, प्रमोद अरसूळ, पद्माकर कांबळे, स्वाती भापकर, माधुरी येनपुरे, क्षितिज मदनाल, अमित महाडिक आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Fundraising the funds for the direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.