जगताप परिवाराकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:05+5:302021-01-08T04:29:05+5:30

यावेली कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माधव भंडारी यांनी लिहिलेल्या अयोध्येवरील पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमात जगताप यांचा सत्कार करण्यात ...

Funding for Shriram Janmabhoomi Shrine from Jagtap Family | जगताप परिवाराकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी निधी

जगताप परिवाराकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी निधी

यावेली कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माधव भंडारी यांनी लिहिलेल्या अयोध्येवरील पुस्तक प्रकाशन सोहळा कार्यक्रमात जगताप यांचा सत्कार करण्यात आला. जगताप म्हणाले की, माझ्या परिवाराने अयोध्येतील राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी हा निधी दिला असून याबाबत मला अभिमान आहे. यावेळी अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते पुस्तक देण्यात आले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे शहराचे संघ कार्यवाहक महेश करपे, गटनेते गणेश बिडकर, दिपक पोटे, गणेश घोष, कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनित जोशी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले.ॉ

-

फोटो ०४ धायरी आयोध्या मंदीर

Web Title: Funding for Shriram Janmabhoomi Shrine from Jagtap Family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.