सायंबाचीवाडी हे गाव वेगाने आदर्शगावाच्या दिशेने प्रवास करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विविध योजनाअंतर्गत गावामध्ये विकासकामे सुरू आहेत. सायंबाच्यावाडीची ग्रामपंचायत इमारत राज्यातील पहिली हरित इमारत म्हणून आकाराला येत आहे. या इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ४० लाख, परिसरत सुधारणेसाठी २० लाख, जगताप वस्ती अंतर्गत सुधारणेसाठी २० लाख, जग्गनाथ भापकर माथ्याचा मळा ते लोणी बारामती रस्त्यासाठी २० लाख, जळकेवस्ती ते अमोल जगताप व जाधववस्ती रस्त्यासाठी १० लाख, सायंबाचीवाडी ते काºहाटी ढाकाळे शिव मरेवस्ती रस्त्यासाठी १० लाख, भगत आळी ते पाटील भाऊ भापकर रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर लेखाशीर्ष २५१५ नुसार मदनेवस्ती ते बांधलवस्ती रस्त्यासाठी २० लाख, जगतापवस्ती अंतर्गत रस्त्यासाठी १५ लाख, कांबळेवस्ती ते नारायण शितोळेवस्ती रस्ता २५ लाख, गायकवाडवस्ती रस्ता २० लाख व जगतापवस्ती सामाजिक सभागृह सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्याने गावातील विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.
सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी २ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST