शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ‘ राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’चे कामकाज एक एप्रिलपासून होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:48 IST

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ६५० याचिकांवर जलद गतीने सुनावणी

ठळक मुद्देन्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची न्यायाधीशपदी नियुक्ती

पुणे : न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीअभावी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असलेले  ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’चे (एनजीटी) पश्चिम खंडपीठ (पुणे बेंच) येत्या १ एप्रिलपासून सुरू होणार आहे, अशी माहिती देणारे पत्रक एनजीटी मुख्य न्यायपीठाच्या उपकुलसचिवांनी काढले आहे. यात त्यांनी न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली असून आणि सिद्धार्थ दास हे यापुढील काळात एनजीटीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ६५० याचिकांवर जलद गतीने सुनावणी होईल. ‘एनजीटी’च्या मुख्य न्यायपीठाच्या उपकुलसचिव डॉ. सुखदा प्रीतम यांनी नियुक्तीबाबतचे अधिकृत परिपत्रक बुधवारी प्रसिद्ध केले आहे. त्यात पुणे एनजीटीत तज्ज्ञ सदस्य म्हणून सिद्धांत दास यांची निवड केली आहे. न्यायाधीशांची नियुक्ती झाल्यानंतर पुण्यातील एनजीटी फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याची चर्चा होती. यावर अखेर प्रशासनाकडून पदनियुक्ती करून त्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कामकाज जलद गतीने सुरू व्हावे, यासाठी सातत्याने एनजीटी बार असोसिएशनकडून पाठपुरावा केला जात होता. मात्र, एनजीटीच्या पुण्यासह सर्व विभागीय खंडपीठांमध्ये न्यायाधीश आणि तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे देशभरातील पाचही खंडपीठांचे काम दोन वर्षांपासून मंदावले होते. दिल्लीच्या मुख्य न्यायपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आठवड्यातून दोन दिवस सुनावणी सुरू होती. मात्र, त्यातून काहीच साध्य होत नसल्याचा दावा वकील आणि पक्षकारांनी केला होता. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयState Governmentराज्य सरकार