‘सहकार’ला मिळेना पूर्ण वेळ आयुक्त
By Admin | Updated: July 3, 2017 03:16 IST2017-07-03T03:16:42+5:302017-07-03T03:16:42+5:30
राज्याचे सहकार आयुक्तपद सुमारे दोन महिन्यापासून रिक्त असल्याने सहकार विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असून एकेकाळी ‘झिरो पेंडन्सी’ झालेल्या

‘सहकार’ला मिळेना पूर्ण वेळ आयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे सहकार आयुक्तपद सुमारे दोन महिन्यापासून रिक्त असल्याने सहकार विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असून एकेकाळी ‘झिरो पेंडन्सी’ झालेल्या विभागात आता फाईलचा ढिगारा साचत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर सहकार कार्यालयाची जबाबदारी वाढलेली असताना या विभागाला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात सहकार क्षेत्राचे जाळे मोठे असून या विभागाकडील कामाचा व्यापही अधिक आहे.सहकार क्षेत्राशी निगडीत असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्व सामान्य नागरिक अनेक कामांसाठी सहकार कार्यालयात येत असतात. मात्र, एप्रिल महिन्यापासून सहकार विभागाला पूर्ण वेळ आयुक्त मिळत नसल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.
धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय आणि सहकार आयुक्त कार्यालय या दोन्ही कार्यालयाच्या कामाचा पसारा मोठा आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या महसूल परिषदेमध्ये महसूल विभागाशी निगडीत अनेक प्रकरणे पेंडिंग राहत असल्याची चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे सहकार विभागाला पूर्ण वेळ आयुक्त देण्याची आवश्यकता आहे.