गोळीबारात तरुण बचावला

By Admin | Updated: May 27, 2014 06:51 IST2014-05-27T06:51:48+5:302014-05-27T06:51:48+5:30

पानशेत रस्त्यावर चार हल्लेखोर तरुणांनी केलेल्या गोळीबारातून दीपक कडू हा युवक बचावला. हल्लेखोरांनी गोळीबार करुन लगेचच पळ काढला.

The fugitives left the youth | गोळीबारात तरुण बचावला

गोळीबारात तरुण बचावला

खडकवासला : पानशेत रस्त्यावर चार हल्लेखोर तरुणांनी केलेल्या गोळीबारातून दीपक कडू हा युवक बचावला. हल्लेखोरांनी गोळीबार करुन लगेचच पळ काढला. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांची नावे स्पष्ट झालेली नाहीत. पानशेत रस्त्यावर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. दीपक सुभाष कडू (रा. कुरण खुर्द) हा आज त्याचे दुचाकीवरुन पुण्याच्या दिशेने येत असताना निगडे-ओसाडे या गावचे हद्दीलगत पाठीमागून दोन दुचाकींवर आलेल्या चार हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या दिशेने गोळीबार करत दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने यात दीपकला कोणतीही दुखापत झाली नाही. हल्लेखोर तरुणही लगेचच पुण्याच्या दिशेने पसार झाल्याने या हल्ल्याबाबत संदिग्धता वाढली आहे. (वार्ताहर)

Web Title: The fugitives left the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.