बलत्कार करून फरारी आरोपीला बेड्या ठोकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:59+5:302021-05-30T04:08:59+5:30

संदिप ढमाले पिडित मुलीचा नातेवाईक असल्यामुळे वरचेवर राजगुरूनगर येथे मुक्कामी राहण्यास येत होता. दि. १४ एप्रिल रोजी संदीप ढमाले ...

The fugitive handcuffed the accused | बलत्कार करून फरारी आरोपीला बेड्या ठोकल्या

बलत्कार करून फरारी आरोपीला बेड्या ठोकल्या

संदिप ढमाले पिडित मुलीचा नातेवाईक असल्यामुळे वरचेवर राजगुरूनगर येथे मुक्कामी राहण्यास येत होता. दि. १४ एप्रिल रोजी संदीप ढमाले हा पिडित मुलीच्या घरी मुक्कामी होता.रात्रीचे जेवण करून सगळे झापले असता,ढमाले यांने पिडित मुलीच्या खोलीमध्ये जाऊन पिडीत मुलगी झोपेत असताना लैंगिक कृत कले. दरम्यान पिडित मुलगी झोपेतुन जागी झाली व ओरडण्याचा प्रयत्न केला. ढमाले यांने मुलीचे तोंड दाबून तु आरडोओरड केला तर जीवे मारून टाकीण अशी धमकी देऊन फरार झाला होता. दुसऱ्या दिवशी पिडित मुलीने आई वडीलांना घडलेला प्रकार सांगितला. पिडित मुलीच्या आईने ढमाले यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ढमाले फरार झाला होता. दिड महिने खेड पोलिस त्यांच्या मागावर होते.पुणे येथे राहत्या घरी ढमाले येणार असल्याची खेड पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिस हवालदार सचिन जतकर, स्वप्रील गाढवे, शेखर भोईर, निखिल गिरीगोसावी, योगश भंडारे यांनी सापळा लावून सिंहगड रोड येथे एका पुलाखाली थांबलेल्या ढमाले याला पोलिसांनी अटक केलीअसुन गुन्हा कबुल केला आहे..

Web Title: The fugitive handcuffed the accused