फरारी आरोपी अटकेत

By Admin | Updated: April 26, 2017 04:12 IST2017-04-26T04:12:44+5:302017-04-26T04:12:44+5:30

तरुणाला लोखंडी फायटरने मारहाण करून सोन्याची साखळी चोरून नेणारा गुंड अमित शिर्के व त्याच्या साथीदारांपैकी फरार असलेल्या

Fugitive arrest accused | फरारी आरोपी अटकेत

फरारी आरोपी अटकेत

पुणे : तरुणाला लोखंडी फायटरने मारहाण करून सोन्याची साखळी चोरून नेणारा गुंड अमित शिर्के व त्याच्या साथीदारांपैकी फरार असलेल्या आरोपीला एक वर्षानंतर पकडण्यात यश आले. सर्व आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
१ जून २०१६ रोजी मंगेश कुंडलिक जावळकर (रा. कात्रज) हे विजय चव्हाण व संतोष साबळे या मित्रांसह हॉटेलमधून जेवण करून बाहेर आले. त्या वेळी दत्तनगर परिसरातील अमित शिर्के व त्याच्या साथीदारांनी जावळकर व त्यांच्या मित्रांवर हल्ला करून त्यांना हाताने व लोखंडी फायटरने मारहाण करून विजय चव्हाण यांना जबर जखमी केले. त्याच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेली.
या प्रकरणी शिर्के आणि साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमधील तात्या ऊर्फ स्वप्निल झगडे (रा. स. नं. २५/४ पांडुरंगनगर, आंबेगाव पठार) हा फरारी होता. त्याचा शोध भारती विद्यापीठ पोलीस घेत होते. तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप गुरव यांना झगडे हा खंडोबा चौकात सुखसागरनगर कात्रज येथे एका पानाच्या टपरीवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: Fugitive arrest accused