शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CID ची पुण्यात कारवाई, तीन वर्षांपासून फरार असलेल्या ॲड. सागर सूर्यवंशीला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 20:19 IST

सीआयडीने ॲड.सूर्यवंशी याला शुक्रवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी अटक केली

पुणे: अनेक नामावंतांना धमकावून त्यांची फसवणूक करणार्या व पुणे जिल्हा न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आलेल्या ॲड. सागर सूर्यवंशी याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका मंदिराच्या आवारातून ताब्यात घेतले. ॲड. सागर मारुती सूर्यवंशी याच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिवाजीनगर, पिंपरी, भोसरी एमआयडीसी तसेच नवघर पोलीस ठाण्यात मिळून एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या ३ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

अटक पूर्व जामिनासाठी त्याने थेट सर्वेाच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केला होता. तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला होता. त्याला पोलिसांकडे हजर राहण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. तरीही तो हजर राहिला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली. जिल्हा न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते. तसेच, उच्च न्यायालयाने गेल्या ३ वर्षापासून फरार असलेला अॅड. सूर्यवंशीला का अटक होत नाही अशी विचारणा देखील सीआयडीकडे केली होती. त्यानंतर सीआयडीच्या पथकाने याबाबत गांभीर्याने दखल घेत सूर्यवंशी याचा तपास सुरु केला होता. त्यासाठी दोन विशेष पथकांची स्थापना केली होती.

सूर्यवंशी हा पुण्यातील शुक्रवार पेठेतील रेणुका मातेचा भक्त असल्याने तो नवरात्रीमुळे शुक्रवारी रात्री दहा वाजता मंदिरात येणार असल्याची माहिती सीआयडीच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करुन सापळा रचला. तो दर्शनासाठी येताच त्याला अटक केली. सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पथक तपास करीत आहेत.

सूर्यवंशी ससूनमध्ये ॲडमिटसीआयडीने ॲड.सूर्यवंशी याला शुक्रवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी अटक केली. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्याच्या तक्रारीनुसार डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेतले आहे. तसे न्यायालयाला कळविण्यात आले असल्याचे सीआयडीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे