पारगाव मेमाणे गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:16+5:302021-09-02T04:23:16+5:30

गेल्या २१ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने सचिन मेमाने यांच्या घरावर हत्यारांसह हल्ला केला. कुटुंबीयांना ...

Fugitive accused in Pargaon Memane case arrested | पारगाव मेमाणे गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

पारगाव मेमाणे गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक

गेल्या २१ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने सचिन मेमाने यांच्या घरावर हत्यारांसह हल्ला केला. कुटुंबीयांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. यात कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते. पोलिसांनी दि.२२ ऑगस्ट रोजी सासवड, राजगड पोलिसांच्या मदतीने कोंबिंग ऑपरेशन करीत यातील सात आरोपीना अटक केली होती. यातील गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार व इतर आरोपी फरार होते. जेजुरी पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत होते. २६ ऑगस्ट रोजी हे आरोपी कुठे आहेत याचा सुगावा पोलिसांना लागला. रातोरात जेजुरी पोलिसांनी जुन्नर पोलीस ठाण्याच्या ह्ददीतुन आरोपीना अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आदित्य भगवान कळमकर (रा. बेलसर), आदित्य तानाजी चौधरी (रा. नारायणपूर, सागर काळूराम वायकर रा. पिसर्वे), श्रेयस संतोष थिटे (रा. वीर), आकाश प्रकाश काळे (रा. सोनोरी) या २० ते २५ वयोगटातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल, धारदार हत्यारे, आणि गुन्ह्यासाठी वापरलेली चार चाकी स्वीप्ट डिझायर गाडी ही जप्त केली आहे.

तपासा दरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली गाडी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून आणलेली आहे.

आरोपींवर बेकायदा जमाव जमवून दहशत माजवणे, बेकायदा हत्यारे बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, आदी कलमाखाली गुन्हा दाखल असून तपासात त्यांच्यावर अजून ही गुन्हे दाखल होऊ शकतील असे अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फोटो : पारगाव मेमाणे येथील गुन्ह्यातील आरोपी व जेजुरी पोलीस.

310821\img-20210831-wa0037.jpg

पारगाव मेमाणे येथील गुन्ह्यातील आरोपी व जेजुरी पोलिस

Web Title: Fugitive accused in Pargaon Memane case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.