खुनातील फरार आरोपीस कुरकुंभ येथे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:42+5:302021-07-27T04:12:42+5:30
नयूम सय्यद याने मंगळवार (दि.२०) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास दिपक आनंदराव सोनवणे (वय ३३, राल.उंडवडी सुपे) याचा ...

खुनातील फरार आरोपीस कुरकुंभ येथे अटक
नयूम सय्यद याने मंगळवार (दि.२०) रोजी रात्री ८:३० च्या सुमारास दिपक आनंदराव सोनवणे (वय ३३, राल.उंडवडी सुपे) याचा जुन्या भांडणातून जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दीपक सोनवणे गंभीर जखमी झाला होता. त्याचा ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दिपक याची पत्नी मनीषा दिपक सोनवणे हिने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी फरार असल्याने शोध पथकाच्या साहाय्याने विविध तालुक्यात शोध सुरू करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार,पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे यांच्या मार्गदर्शनात दौंड तालुक्यातील पोलीसांना दिलेल्या माहीतीच्या आधारे कुरकुंभ येथे कार्यरत पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, राकेश फाळके ,दत्तात्रय चांदणे,अमोल राऊत, महेश पवार, अक्षय कांबळे यांनी ही कारवाई केली.
फोटो ओळ : अटकेत असलेल्या आरोपीसह कुरकुंभ येथील पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, महेश पवार, अक्षय कांबळे.