शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्तीच्या नावावर रंगवल्या भिंती ; एफटीअायअायच्या दाेन विद्यार्थ्यांचा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 17:40 IST

नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढून दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीन विद्रुप केले अाहे. त्यावर संस्थेने दाेन विद्यार्थ्यांना तातडीने वसतीगृह साेडण्यास सांगितले अाहे.

पुणे : राष्ट्रीय चित्रपट अाणि दुरचित्रवाणी संस्था (एफटीअायअाय) मधील दाेन विद्यार्थ्यांनी काढलेल्या दाेन चित्रांमुळे पुन्हा एकदा एफटीअायअायमध्ये वाद निर्माण झाला अाहे. नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे उद्घाटन हाेऊन एकच दिवस झाला हाेता ताेच दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्रे काढून कॅंन्टीन विद्रूप केले अाहे. त्यामुळे संस्थेच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना वसतीगृह रिकामे करण्याची नाेटीस दिली अाहे. 

    एफटीअायअाटचे कॅन्टीन नूतनिकरणासाठी काही दिवस बंद हाेते. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचे उद्घाटन करण्यात अाले. उद्घाटन झाल्यानंतर  एका दिवसातच संस्थेतील दाेन विद्यार्थ्यांनी कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्रे काढली. या चित्रांमध्ये एका चित्रात कवी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या हम देखेंगे या अाेळी लिहिण्यात अाल्या अाहेत. रात्रीच्या वेळी हेतुपुरस्पर दहशत पसरविण्याच्या हेतून ही चित्रे काढली असल्याचे एफटीअायअायचे संचालक भूपेंद्र कॅंथाेला यांचे म्हणणे अाहे. विशेष म्हणजे सुरुक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थ्यांनी ही चित्रे काढली. प्रशासनाने केलेली कारवाई ही अभिव्यकीवर हल्ला असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे अाहे, तर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी त्या दाेन विद्यार्थ्यांनी केलेली कृती ही चुकीची असल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले. 

    नाव न लिहिण्याच्या अटीवर एफटीअायाअायचा एक विद्यार्थी म्हणाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच असले पाहिजे. परंतु नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंती तसेच दरवाज्यावर चित्र काढण्याला अभिव्यक्ती म्हणता येणार नाही. तुमची अभिव्यक्ती ही तुम्ही तयार करणाऱ्या फिल्म्स मध्ये दाखवा.  अश्याप्रकारे कॅन्टीन विद्रुप करण्याचा हक्क त्यांना काेणी दिला. त्यामुळे प्रशासनाने कारवाई केली तर त्यात चूक काही नाही. दुसरा एक विद्यार्थी म्हणाला, अनेक विद्यार्थी हे सबमिशनमध्ये असल्याने त्यांनी या वादात पडायचे टाळले. अश्याप्रकारे चित्र काढण्याची गरज नाही. अनेक विद्यार्थ्यांचा या कृतीला पाठींबा नाही. अभिव्यक्ती दुसरीकडे दाखवायला हवी.     ------------------------------दाेन विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाज्यावर चित्र व घाेषणा लिहून कॅंन्टीन विद्रुप केले अाहे. रात्रीच्या वेळेस हे काम केले असून एफटीअायअायच्या सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थी थांबले नाहीत. नूतनीकरण केलेल्या कॅंन्टीनचे उद्घाटन हाेऊन एक दिवस झाला हाेताे ताेच विद्यार्थ्यांनी ते विद्रूप केल्याने ते कदापी स्वीकारण्यासारखे नाही. एफटीअायअायच्या माजी विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे काैतुक केले हाेते. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनी देखील या कृत्याचा निषेध केला अाहे. - भूपेंद्र कॅंथाेला, संचालक एफटीअायअाय

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थीnewsबातम्या